झी टॉकीज'चा नवा साज - Marathi TV Channel Zee Talkies Unveils Brand New Look

Zee Talkies

Zee Talkies (Photo credit: Wikipedia)

(This post is in Unicode Marathi font, followed by English).

'झी टॉकीज'चा नवा साज

रंग नवा ढंग नवा
बांधला हाबंध नवा
८ तारखेस घेऊ आम्ही, साज नवा...
नव्या रूपातही तुमचा,तोच जुना संग हवा.

असं म्हणत प्रेक्षकांची लाडकी वाहिनी'झी टॉकीज'येत्या ८ नोव्हेंबरला  नव्या रंगात व नव्या ढंगात अवतरणार आहे. प्रेक्षकांशी आपलेपणाची नाळ जोडलेल्या 'झी टॉकीज'ने नेहमीच प्रेक्षकांची अभिरुची जपत त्यांना हव्या असलेल्या बदलासाठी पुढाकार घेतलाआहे.

आपलं टॉकीज...'झी टॉकीज' ही बिरुदावली सार्थ ठरवणारं'झी टॉकीज'येत्या८ नोव्हेंबरला नवा साज घेऊन अवतरणार आहे. हा नवा साज अधिक उत्साही व चैतन्यदायीअसणार आहे.

'झी टॉकीज'चाभगवा रंग म्हणजे महाराष्ट्र...आपली माती, आपली नाती, आपला रांगडा स्वभाव,आपलं चैतन्य...हाच भगवा रंग आता वेगळ्या रंगतदार रुपात 'झी टॉकीज' वरयेणार आहे. नवनवीन चित्रपटांच्या प्रीमियर्स व्यतिरिक्त अनोख्या व दर्जेदार कार्यक्रमांची आणि उपक्रमांची मेजवानी यामुळे वाहिनीवर सगळ्याच बाबतीत बदल दिसून येणार आहे. वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या नव्या जुन्या सिनेमांचा उत्तम मिलाफ व नवनवीन कार्यक्रमांची रेलचेल या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्राचा प्रेक्षक जास्तीत जास्त वेळ 'झी टॉकीज' ही वाहिनी बघेल,असा विश्वास 'झी टॉकीज'चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी व्यक्त केला आहे.

असं म्हणतात ‘सिनेमा’ हा ‘समाजाचा आरसा’ असतो. सिनेमाचा विलक्षण प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो. पडद्यावरच्या प्रत्येक भाव-भावनाआपण जगत असतो.‘लई भारी’,‘टाईमपास’सारखे मनोरंजक, ‘एलिझाबेथ एकादशी’ सारखे निखळ करमणूक करणारे तर‘ ‘फँड्री’ किंवा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ सारखे थोडासा स्वतःशीच विचार करायला लावणारे चित्रपट 'झी टॉकीज' ने आपल्या वाहिनीवर दाखवून महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला आपलसं केलयं तोच विश्वास आता आपलंटॉकीज‘झी टॉकीज'...बघणं नव्हे जगणं असं सांगत सिनेमाकडे बघण्याचा दृष्टीकोन नव्या रुपात प्रेक्षकांना देणार आहे.

वाहिनीवर झालेला बदल प्रेक्षकांना नक्कीच जाणवेल. मराठी भाषा व संस्कृतीचे प्रतिबिंब उमटतील असे उपक्रम आणि प्रेक्षकांचा सहभाग असलेले कार्यक्रम अशा नव्या स्वरुपात आपलं टॉकीज'झी टॉकीज'प्रेक्षकांना आपलसं करेलच शिवाय नवीन येणाऱ्या प्रेक्षकांनाही मनोरंजनाने या वाहिनीवर खिळवून ठेवेल असाही विश्वास'झी टॉकीज'चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी बोलून दाखवला आहे.त्यामुळेमनोरंजनाला एक नवी दिशा देण्याचा 'झी टॉकीज'चा प्रयत्न रसिकमान्य होईल यात शंका नाही.

आगामी काळात 'झी टॉकीज'वेगळय़ा धाटणीचे उपक्रम घेऊन येणार आहे.ज्यात ‘लाईट हाऊस’ हा लघुपटांचा आगळा उपक्रम, महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळा व ‘डबल सीट’ या चित्रपटाचा भव्य प्रिमिअर अशा अनेक मनोरंजक कार्यक्रमांचा समावेश आहे. या नाविन्यपूर्ण बदलांमुळे प्रेक्षकांची 'झी टॉकीज'शी असलेली नाळ अधिक दृढ होणार आहे.मनोरंजनाच्या दुनियेतील ही नवीन नांदी असेल असं म्हटल्यास वावग ठरू नये.

The Brand’s Visual Identity Takes A Fresh Avatar

Mumbai, November 10, 2015 (Washington Bangla Radio): Maharashtra’s No. 1 Reach Channel, Zee Talkies is launching a brand new visual identity that reinforces the positioning of Zee Talkies as a Film Entertainment Channel. The ideology behind the fresh look and feel is to urge audiences to live and experience Zee Talkies, rather than just watch - ‘Baghna Navhe…Jagna’.

A glossy new look aims at adding a flavor of liveliness to the visual identity. The channel sheds its ‘sedate’ color for a bright orange color that symbolizes vibrancy and festivity. Orange, in its many forms, stands for positivity, energy & richness while representing the essence of Maharashtra to create an affinity for the brand, Zee Talkies. The repackaging activity is a part of Zee Talkies’ strategy to provide a wholesome viewing experience to the audiences of Maharashtra.

We believe that a striking visual identity will ensure a deep connect with the audiences.

Zee Talkies has kept its promise to provide complete entertainment at every step of the way through innovative activities, contests and creative campaigns. An initiative in this direction is the World Television Premiere of ‘Double Seat’, a blockbuster hit! Maharashtra’s most glamorous event, a one-of-its-kind award show ‘Maharashtracha Favorite Kaun’ where the winners are chosen purely on audience votes, is also organized by Zee Talkies. In addition, the channel will be launching ‘Talkies Lighthouse’, a show that will present a collection of highly acclaimed short films, packaged in an entertaining format, to the audiences of Maharashtra.

A 24 hour movie channel, launched with the exclusive objective to build reach of Marathi cinema across Maharashtra, today also stands as the No.1 Marathi movie Channel of Maharashtra. The channel reaches out to about 20 million people across Maharashtra on a weekly average basis. Zee Talkies owns the biggest library of Marathi masterpieces. Right from the old classics like ‘Sadhi Manase’, ‘Jagachya Pathiwar’, ‘Chhatrapati Shivaji’, ‘Molkarin’, ‘Gulacha Ganpati’ to the most critically acclaimed movies like ‘Natrang’ and ‘Shwaas’. It showcases all the following blockbusters from the world of Marathi Cinema ranging from ‘Ashi hi Banva Banv’i to ‘Duniyadaari’ to ‘Lai Bhaari’.