Blockbuster Marathi Movie "Double Seat" World TV Premiere on Zee Talkies

Zee Talkies

Zee Talkies (Photo credit: Wikipedia)

Mumbai, October 30, 2015 (Washington Bangla Radio): Watch the world television premiere of Marathi blockbuster film ‘Double Seat’ on Zee Talkies this November. ‘Double Seat’ is the journey of a newly-married couple that nurtures a dream and works hard to make it real.

The film’s story is relatable and reminds every Mumbaikar of their aspirations. The behavior and mannerisms of the lead characters and their humor beautifully captures the true essence of a lower-middle class life in a fast paced city like Mumbai.

Directed by Sameer Vidwans, the film did exceptionally well at the Box-office earning 5 crores in just five days. Ankush and Mukta’s chemistry was widely praised by the audience and the film received a good response from both Marathi and non-Marathi speaking fans.

Watch one of Maharashtra’s most loved films ‘Double Seat’ for the first time on Zee Talkies.

Date:  8th November

Time:  12 pm & 6 pm

Channel:  Zee Talkies

Cast: Ankush Choudhary, Mukta Barve, Vidyadhar Joshi and Vandana Gupte

 

Synopsis:  Double Seat highlights the family struggles of newly married couple Amit and Manjiri. They wish to move out of their family home and buy a house together. While Amit was born and raised in metropolitan Mumbai, Manjiri is from the village of Loha and has difficulty coping with city life. Amit works in the packing business and is chained to this reality by his father, who trains horses. Manjiri, on the other hand, has a zest for life, and is optimistic about working as an LIC agent.

अंकुश आणि मुक्ता च्या स्वप्नांची  रंजक कहाणी

झी टॉकीज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


सतत धावणारं शहर अशी या मुंबईची ओळख. पण हे शहर कशामागे धावतं? असा प्रश्न विचारलं तर एकच उत्तर

मिळेल. स्वप्नांच्या मागे. इथे जणू स्वप्नांची एक स्पर्धाच चाललेली असते. स्वप्नांचा हा प्रवास या शहरात दिवस-

रात्र अविरत चालत असतो. कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन अंकुश आणि मुक्ताने ने

पाहिलेल्या अशाचं स्वप्नाची आणि त्यांच्या अनोख्या प्रवासाची गोष्ट लवकरच झी टॉकीज वर पाहायला मिळणार

स्वप्नांचा डबल सीट प्रवास करणारे अमित आणि मंजिरी म्हणजेच अंकुश आणि मुक्ता यांनी स्वप्न पूर्ततेसाठी 

घेतलेली उडी प्रत्येकाला बळ देणारी आहे. झी टॉकीज वर दाखवण्यात येणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरसाठी नुकतंच

प्रोमो शूट करण्यात आलं. या शूटच्यावेळी या दोघांनी डबल सीट चा नॅास्टॅल्जिक अनुभव पुन्हा घेतला. रसिकांची

मने जिंकत मोठा पडदा गाजवणारा डबल सीट आता छोट्या पडद्यावर येत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज

झी टॉकीज वर ८ नोव्हेंबरला दुपारी १२ वा., आणि संध्याकाळी ६ वा. डबल सीट चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

प्रसारित केला जाणार आहे. झी टॉकीज वर दाखवल्या जाणाऱ्या डबल सीटच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरविषयी

अंकुश आणि मुक्ता हे दोघही उत्सुक आहेत. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी जो भरभरून प्रतिसाद दिला तो अविस्मणीय

होताचं, आता झी टॉकीजच्या माध्यामतून दाखवल्या जाणाऱ्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांशी आणखीन जवळचं नातं

निर्माण होईल असं मत मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केलं. घराचं स्वप्न आता प्रत्येक घराघरात जाणार आहे याचा आनंद

मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केला. आम्ही हा प्रवास जितका एन्जॉय केला तितकाचं हा प्रवास प्रेक्षकसुद्धा एन्जॉय

करतील असा विश्वास अंकुश चौधरीने व्यक्त केला.

प्रत्येकजण आपलं आयुष्य सुंदर करायचा प्रयत्न करत असतो.प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा व स्वप्नं असतात,

पण त्यांचा पाठपुरावा करण्याची ताकद प्रत्येकाकडे असतेच असं नाही. त्यासाठी आतून ती प्रेरणा मिळणं, आतून

आवाज येणं आवश्यक असतं. आपला आतला आवाज ऐकून त्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्यांची ही कथा म्हणजेच

डबल सीट.  या चित्रपटात अमितची भूमिका साकारलीये अंकुश चौधरीने तर मंजिरीच्या भूमिकेत आहे मुक्ता बर्वे. या

चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. याशिवाय चित्रपटात विद्याधर जोशी,

वंदना गुप्ते, शुभंकर तावडे, संदीप पाठक, आसावरी जोशी आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

 अंकुश आणि मुक्ताच्या स्वप्नांची ही कहाणी झी टॉकीज वर ८ नोव्हेंबरला दुपारी १२ वा. वा. आणि संध्याकाळी ६ वा.

अवश्य पाहा.